रत्नागिरी :सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आणि तरुण नेतृत्वाला सहकाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी यांच्यातर्फे ‘सहकार कार्यकर्ता प्रशिक्षण’ वर्गाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
हे निवासी प्रशिक्षण ३१ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे पार पडणार आहे. सहकार क्षेत्रातील नामांकित ‘डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रबंध संस्थान, पुणे’ या संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाईल.

प्रशिक्षणामधील प्रमुख विषय आणि वैशिष्ट्ये:
राज्यस्तरीय पतरचनेत जिल्हा बँका व सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना खालील विषयांचे सखोल ज्ञान व माहिती दिली जाईल:
- सहकारी कायदा व कायदेशीर बाबी
- वित्तीय व्यवस्थापन आणि बँक व्यवसाय
- संचालक मंडळाची कार्यपद्धती व जबाबदारी
- लेखापरीक्षण (Audit) आणि आधुनिक तंत्रज्ञान
- ग्रामीण व कृषी क्षेत्राचा विकास
- अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित तालुक्यातील बँकेचे क्षेत्रीय कार्यालय अथवा प्रधान कार्यालय, प्रशासन विभाग (रत्नागिरी).
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ जुलै २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)













