शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या घरासमोरुन रॅली काढण्यास आदित्य ठाकरेंना परवानगी नाकारली

सावंतवाडी : शिवसेनीतील झालेल्या गळतीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा सुरु केली यांच्या आज होणाऱ्या निष्ठा यात्रेला सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून निघणाऱ्या रॅलीला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

सिधुदुर्ग जिल्ह्यातील या यात्रेदरम्यान आज होणार्‍या सावंतवाडीतील रैलीपुर्वी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ही मिरवणूक आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या घरासमोरुन जाणार होती. या पार्श्वभूमिवर शिवसैनिकांना दीपक केसरकर यांच्या घरासमोरुन मिरवणूक नेण्यास पोलिसांकडून मज्जाव केला आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE