उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत दिनांक १३ सप्टेंबर २२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. उरण तालुक्यातील ग्रामिण व शहरी भागातील एकूण लोकसंख्या १०३३२० चे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याकरीता ८१ आरोग्य पथके व १६ पर्यवेक्षक नेमणूक करण्यात आलेली आहे.
२२९६० घरांचे सर्वेक्षण होणर आहे.उरण तालुक्यातील आदीवासी भाग, डोंगराळ भाग व शहरी भागातील झोपडपटटी कोळीवाडा इत्यादी भागातील कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेचे प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे सहाय्यक संचालक डॉ. आर. एच. बाविस्कर, प्रभारी गटविकास अधिकारी उरण संजय भोये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे व ग्रामिण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. बाबासो कालेल यांनी तालुक्यातील जनतेला तपासणी करण्याकरीता जाहीर आवाहन केले आहे.















