मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती


कडवई : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तुरळ कडवई येथे शिवसैनिकांशी मनमोकळा संवाद साधला. कडवई जिल्हा परीषद गटाच्या वतिने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परीषदेचे मा. अध्यक्ष संतोष थेराडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. भर पावसात देखील शिवसैनिकांचा उत्साह पाहून आदित्य ठाकरे भारावून गेले.
यावेळी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.जनसामान्यांची ताकदच खोके घेऊन धोके देणाऱ्या सरकारला त्यांची खरी जागा दाखवून देईल, असा विश्वास आदित्यजींनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर बोलताना संतोष थेराडे यांनी सांगितले की, आदित्य साहेबांचे भाषण हे आम्हा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे होते. यापुढे सर्व शिवसैनिकांना आणखी जोमाने लढण्याची ताकद या भाषणातून मिळाल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय कुवळेकर यांनी केले.














