रत्नागिरीत हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसह लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

रत्नागिरी : तेलंगणा येथील आमदार टी. राजासिंह ठाकूर यांना ठार मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी तसेच टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांना कारगृहातून मुक्त करावे, तसेच महाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागण्यांसाठी बुधवारी मारुती मंदिर, रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी टी. राजासिंह यांच्यावरील कारवाईचा आणि लव्ह जिहाद षडयंत्राचा निषेध करण्यात आला.


तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्याप्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता; मात्र जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगणा सरकारने त्यांना जुन्या प्रकरणात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यांतर्गत जाणीवपूर्वक अटक करून 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा भयंकर कट रचला आहे. अटकेपूर्वी आणि अटकेनंतर त्यांना ‘सर तनसे जुदा’सारख्या धमक्या देत हिंसक आंदोलने केली गेली. तेलंगणातील काँग्रेसचे नेते कायदा हातात घेण्याची भाषा करून तेलंगणाचे वातावरण बिघडवत असूनही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तेलंगणा पोलिस ओवैसी बंधूंच्या हातातील बाहुले बनले आहेत. राजासिंहाना न्याय मिळण्याची शक्यता धुसर असल्याने केंद्र सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करून त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा राज्यांत हस्तांतरित करावेत., अशी मागणी आजच्या आंदोलनात करण्यात आली.
लव्ह जिहादसाठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांची चौकशी करून हे षडयंत्र हाणून पाडावे इत्यादी मागण्याही आजच्या आंदोलनात करण्यात आल्या.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक विनोद गादीकर, विनय पानवलकर, संजय जोशी, तसेच बजरंग दलाचे विराज चव्हाण आणि राजू मोरे, विश्व हिंदू परिषदेचे दीपक जोशी, मरुधर विष्णू समाज समाजाचे दीपक सिंह देवल, रवींद्र सिंह राणावत, गणेश चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे युवराज चिखले, माजी नगरसेविका सौ. शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE