सामाजिक बांधिलकी जपत पिरकोन गावातीयेथील युवकांमार्फत खाऊवाटप

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पिरकोन गावातील रिलेश पाटील, निकेत पाटील, ऋतिक पाटील, शैलेश पाटील, दर्शन ठाकूर, रसिक गावंड हे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. यांचा विविध सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग असतो.पिरकोन गावातील रिलेश पाटील, निकेत पाटील, ऋतिक पाटील, शैलेश पाटील, दर्शन ठाकूर, रसिक गावंड यांच्या तर्फे चिरनेर अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत या युवकांनी सदर सामाजिक उपक्रम राबविला. या पिरकोन गावातील युवकांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE