रत्नागिरीत लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

रत्नागिरी दि. 27 : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑक्टोबर 2022 चा लोकशाही दिन सोमवार 03 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता दूरदृश्यप्रणाली (व्हीडीओ कॉन्फरन्स) च्या माध्यमातून दुपारी 01.00
ते 02.00 या वेळेत होणार आहे.
सदरच्या लोकशाही दिना करिता नागरिकांना संबधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे लोकशाही दिनामध्ये सहभागी होता येईल. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज करु शकतात. सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE