मुंबई, २८ सप्टेंबर २०२२ : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रमुख राजकीय नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्याम गंगाधर भुसेवार यांनी बुधवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत जनता दल (युनायटेड) पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिव डॉ. अर्चना उत्तमराव पाटील (बारामती) यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. त्या ओबीसी आंदोलनात सक्रीय होत्या. प्रदेशाध्यक्षांनी या प्रमुख राजकीय नेत्यांचे स्वागत केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस मा. विक्रांत पाटील उपस्थित होते.
















