शिवसेनेचे माखजन विभागप्रमुख मनोज शिंदे, शिंदे गटात

संगमेश्वर तर्फे धामापूर जि. प. गटात ठाकरे गटाला मोठा धक्का

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर तर्फे धामापूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा दबदबा कायम टिकवून ठेवणारे शिवसेनेचे माखजन विभागप्रमुख मनोज शिंदे,शिंदे गटात दाखल झाले आहेत.
अनेक काळ सुरू असलेल्या पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे मनोज शिंदे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. शिवसेनेचा दबदबा टिकवणारे, ग्रामपंचायतींवर सेनेची एक हाती सत्ता टिकवणारे मनोज शिंदे,शिंदे गटात गेल्याने माखजन परिसरासाठी ठाकरेंच्या सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनोज शिंदे यांच्या पाठीशी अनेक कार्यकर्ते असून एक मोठा गट शिंदे गटात सामील झाला आहे. मनोज शिंदे हे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वीच माजी आमदार सदानंद चव्हाण शिंदे गटात सामील झाले होते.
अनेक काळ पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीला मनोज शिंदे कंटाळले असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय निवडणूकांच्या काळात,आज जे ठाकरे सेनेचे निष्ठावंत असल्याचे भासवत आहेत, त्यांनी राष्ट्रवादीला मदत केल्याचा गौप्यस्फोट श्री मनोज शिंदे यांनी केला आहे.या साऱ्याच गोष्टी वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर घालून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे,माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE