रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांची उपस्थिती
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरीतील भगवान श्री राम मंदिरात आज विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन, अश्वपूजन आणि आपट्याच्या वृक्षाचे पूजन करून ‘राजेशाही दसरा’ सोहळा उत्साहात साजरा केला.
आपट्याच्या वृक्षाचे विधिवत पूजन केल्यानंतर सोने लुटण्यासाठी रत्नागिरीतील जनतेने गर्दी केली. यावेळी उल्हासराव घोसाळकर, ऊर्मिलाताई घोसाळकर, नित्यानंद दळवी, प्रसन्न आंबूलकर, महेंद्र साळवी, सुधाकर सावंत, राकेश चव्हाण, श्री. आंबेकर, श्री. पाटील आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित होते.




















