उरण दि. 8 (विठ्ठल ममताबादे ) : गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या पेट्रोलियम खनिज पाईपलाईन उपक्रमाला कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून या उपक्रमाला विरोध दर्शविण्यासाठी रविवार दि 9/10/2022 रोजी सकाळी 10 वाजता मोठी जुई वाडा येथे शेतकरी एकत्र येणार आहेत. गेल इंडिया कंपनीचे पाईपलाईन उरण तालुक्यातील कळंबूसरे गावातील जमिनीतून पुढे जाणार आहेत. या बाबतीत शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे फायदा नसून उलट नुकसानच आहे. असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर उपक्रमाला कायदेशीर व लोकशाही मार्गाने विरोध दर्शविणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.गेल इंडियाच्या या उपक्रमाच्या विरोधात कळंबूसरे येथील शेतकरी एकवटले असल्याचे चित्र दिसत आहे.















