रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग दिवाळीसाठी उधना जं. – मंगळुरू जं. – उधना अशी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विशेष भाड्यासह साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी धावणार आहे.
याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. विशेष भाड्यासह साप्ताहिक विशेष गाडी असणार आहे.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. विशेष भाड्यासह साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून रविवार, 23/10/2022 आणि 30/10/2022 रोजी सकाळी 20:00 वाजता निघेल आणि ती ट्रेन मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी 18:30 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. मंगळुरु जंक्शन येथून साप्ताहिक स्पेशल स्पेशल भाड्यासह सोमवार 24/10/2022 आणि 31/10/2022 रोजी 20:45 वाजता निघेल आणि ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी 19:15 वाजता पोहचेल.
ही गाडी आपल्या प्रवासात वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीला एकूण २४ डबे असतील. यात संमिश्र (प्रथम एसी + २ टियर एसी) – ०१ कोच, संमिश्र (२ टायर एसी + ३ टायर एसी) – ०२ कोच, स्लीपर – १५ डबे, दुसरे आसन – ०४ डबे, एसएलआर – ०२ अशी रचना असेल.















