देवरुख : (सुरेश सप्रे) : देवरूखातील जुन्या पिढीतील शिक्षक वासुदेव मोरेश्वर साने गुरूजी यांचे दुख:द निधन
सानेगुरूजींनी अनेकांना बालवयात प्राथमिक शिक्षण देण्याचे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले. नव्या युगाला सामोरे जाण्यासाठी शिक्षण देऊन शिक्षित केले, ज्ञान दिले असे सर्व विद्यार्थ्यांना ऋषितुल्य असणारे साने गुरुजी यांनी वयाच्या ८५व्या वर्षी रोहा येथे अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता समजताच देवरूख परिसरात अनेकांनी दुःख व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली.
संस्कारसंपन्न आचार व विचारांनी समृद्ध असणारे मृदू वाणी, सात्विक भाव मनात असणारे व संस्कार संपन्न असलेले गुरूजींनी विद्यार्थीवर्गाशी अतूट भावबंध (नाते) निर्माण केले होते.
अनेकांना प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. इतकी त्यांची शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्द होती.
त्यांच्या अध्यापनात आपण शिकविलेला विषय वर्गातील प्रत्येक विद्यार्थाला समजलाच पाहिजे ही त्यांची धारणा होती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही कित्येक वर्षांपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले.
कुठल्याही शैक्षणिक, सामाजिक तसेच धार्मिक उपक्रमासाठी त्यांचा सहकार्याचा हातभार नेहमीच असे.














