भंडारी समाजाचे नेते ट्रक व्यावसायिक महेश तथा गोट्या भाटकर यांचे निधन

देवरुख : देवरूखातील भंडारी समाजाचे नेते व ट्रक व्यावसायिक महेश तथा गोट्या भाटकर यांचे दि. १३ रोजी निधन झाले. देवरू़ख भंडारवाडी नव तरूण मंडळ व चँलेंजर क्लबचे संस्थापक सदस्य असलेले गोट्या भाटकर यांना २महिन्यापुर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांचेवर रत्नागिरी येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच दि. १३ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर देवरूख स्मशानभुमित अत्यंसंस्कार करण्यात आले.

भंडारा समाजाच्या व गावाच्या प्रत्येक कामात हिरीरीने भाग घेणारे सदैव मदतीचा हात देणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले गोट्या भाई यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्याचे अंत्ययात्रेला माजी उपनगराध्यक्ष अभी शेट्ये. प्रसन्न सार्दळ. सोळजाई मंदीर देवस्थानचे अध्यक्ष शरद गांधी. संतोष लाड. राजन मापुस्कर. पंकज पुसाळकर. हनिफ हरचिरकर. मंदार भाटकर. संदिप भाटकर.. आदी सह विविध मंडळे. संस्था. ट्रक व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE