नाणीज दि. १७ : येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन व वाचन प्रेरणा दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन, सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या प्राचार्या अबोली पाटील व सर्व सहकारी शिक्षकांच्या वतीने झाले. यावेळी इयत्ता सहावीतील ताज कोत्रे तसेच इतर विद्यार्थी यांची भाषणे झाली.
प्रशालेचे सहाय्यक शिक्षक महादेव सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले. हात धुण्याचे प्रात्यक्षिक शिक्षक व मुख्याध्यापकानी करून दाखवले. यावेळी स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृतीसाठी काही घोषवाक्ये तयार करून विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आली.
त्यानंतर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनदेखील प्रशालेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. प्राचार्य अबोली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लिंगायत यांनी केले. आभार सुभाष कोकरे यांनी मानले.
















