जात पडताळणी प्रक्रिया सोपी करणार : समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे

मंडणगड : जात पडताळणी प्रक्रियेचे सुलभीकरण व झिरो पेंडसीकरिता प्रशासन आग्रही असल्याचे प्रतिपादन राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंडणगड येथे केले. शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी कौतुक सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते.


यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, विद्यार्थीनी आपल्या कार्याशी बांधिलकी ठेवून कठोर परिश्रम केले, तर त्यामध्ये निपुणता येईल व आपल्या जीवनामध्ये यशस्वी होता येईल. जगामध्ये संधीची कमतरता नसून ते साध्य करावयाचे असेल तर आपले प्रयत्न आवश्यक आहेत. जातीचा व जात पडताळणीचा दाखला देण्याच्या प्रक्रियेमध्ये आता सुलभीकरण करण्यात आले असून प्रत्येक शाळा-महाविद्यालयामध्ये सदरचे दाखले देण्याची अंमलबजावणी केली जाणार आहे असे ते म्हणाले. जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र शालेय स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग व समाजकल्याण खाते जात प्रमाणपत्र शालेय स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग व समाजकल्याण खाते जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड मॉडेल विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE