माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते पाणजे गावच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन

उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील
ग्रामपंचायत पाणजे यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकामे विभाग,ग्रामविकास व पंचायत राज च्या ४.७० लाख निधीतून पाणजे येथील नवीन प्रवेशद्वाराचे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शुक्रवार दिनाकं ०४/११/२०२२ रोजी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पाणजे गावाच्या वेशीवर सुंदर प्रवेशद्वार बांधल्या बद्दल पाणजे ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व कॉन्ट्रॅक्टर यांचे अभिनंदन केले.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (शिवसेनेचे) उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सरपंच पाणजे करिष्मा हरेश भोईर, उपसरपंच विलास महादेव भोईर, सदस्य मछिंद्र वि पाटील, आशा. दि.भोईर,श्रीमती नम्रता.द. पाटील,प्रभाकर. रा.पाटील,अंजली.ल. पाटील,ललिता.स.पाटील, समिक्षा.स.ठाकूर,डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE