स्व. यादव ममताबादे यांच्या पुण्यतिथीनिमित्त झोपडपट्टीत अन्नदान

उरण दि.९ (विठ्ठल ममताबादे ) : उरण नगर परिषदेचे कर्मचारी स्वर्गीय यादव हिराप्पा ममताबादे यांची प्रथम पुण्यतिथी मंगळवार दिनांक 8/11/2022 रोजी त्यांच्या राहत्या घरी देऊळवाडी, उरण शहर येथे साजरी करण्यात आली. प्रथम पुण्यतिथी निमित्त दुपारी 1 वाजता उरण चारफाटा येथे झोपडपट्टीतील गरीब मुलांना अन्नदान करण्यात आले तर रात्री 7 वाजता पुण्यतिथी निमित्त हरी भक्त पारायण वसंत बुवा मांडेलकर यांचे भजन झाले.

श्रीमती निर्मला हिराप्पा ममताबादे,श्रीमती प्रियांका यादव ममताबादे,सपना मुकेश केदारी,जागृती बालाजी हेड्डे,साईनाथ यादव ममताबादे,श्रद्धा यादव ममताबादे,पत्रकार विठ्ठल नागनाथराव ममताबादे,माधव नागनाथराव ममताबादे, माधव सिद्धेश्वरे,विशाल मरकेले,समस्त ममताबादे परिवार, सिद्धेश्वरे परिवार, मरकेले परिवार, धनुरे परिवार, हेड्डे परिवार, देशमुख परिवार,उरण नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी वर्गांनी आणि आपतेष्ट मित्र मंडळींनी स्व. यादव हिराप्पा ममताबादे यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE