उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : केळवणे गाव आयोजित दीपावली गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मरी आई मंदिराजवळ ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय, तृतीय , १० उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व राज्यांची प्रतिमा व प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास रायगड भूषण महाराष्ट्राचे शिवशाहीर वैभवजी घरत, रायगड भूषण बासरी वादक तेजस पाटील, सुशिल ठाकूर(ग्रामपंचायत सदस्य), नितीन म्हात्रे (समाजसेवक),कुमार पाटील(समाजसेवक), तेजस माळी(ग्रा.पाणी पुरवठा उपाधक्ष), गजानन म्हात्रे (मृदुंगाचार्य), समीर ठाकूर (सूत्रसंचालक ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सौरभ ठाकूर, सन्नी कोळी,मनिष शिवकर, सुशांत ठाकूर, अरकेश म्हात्रे यांनी केले होते.शाहिरांच्या शाहिरीने आणि बासरी च्या वादनाने कार्यक्रमामध्ये रंगत आली.















