उरण दि 9 (विठ्ठल ममताबादे ) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड यांच्यातर्फे दिला जाणारा पत्रकारितेसाठी उरण विशेष सम्मान 2022 पुरस्कार हा या वर्षी मिलिंद खारपाटील यांना देण्यात आला.
द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनच्या मैदानाची ओढ या विषयावर चर्चा (संभाषणे ) या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मिलिंद खारपाटील यांना चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगडतर्फे उरण विशेष सम्मान 2022 हा पुरस्कार द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला महादेव घरत (अध्यक्ष -द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशन ), विकास कडू (संस्थापक अध्यक्ष -चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण ), दिलीप तांडेल (सचिव- द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशन ), संजय होळकर (आदर्श शिक्षक ) रमाकांत म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते ), मिलिंद खारपाटील (महामुंबई युट्युब चॅनेल संपादक ), सचिन पाटील (शाखा प्रमुख डोगरी ), माणिराम म्हात्रे, मनोज ठाकूर (कार्याध्यक्ष -चाईल्ड केअर संस्था )तसेच द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी, चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण चे सभासद आणि शेकडो द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे समर्थक उपस्थित होते.कार्यक्रमामध्ये चला खेळाडू घडवूया या विषयावर रमाकांत म्हात्रे, मिलिंद खारपाटील, विकास कडू, संजय होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत महादेव घरत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होळकर यांनी केले तर महादेव घरत यांनी आभार प्रदर्शन केले.















