मुंबई, दि. १० : सामान्य नागरिकांना “आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी ‘वन सेवा केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री आशीष जयस्वाल, राजकुमार पटेल,, मनोहर चंद्रिकापुरे, विजय हांगडाले, प्रकाश भारसाखळे यांच्यासह वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय.एल.पी.राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी.एस.हुडा,उप वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे जयरामे गौडा आर, गोंदियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.















