खासदार सुनील तटकरे यांची सिडको सोबत बैठक 

आयओटीएल कंपनीवर कारवाई का नाही?

वैजनाथ ठाकूर यांनी दिले होते पत्र

उरण दि. १२(विठ्ठल ममताबादे ) : सीडकोकडील भोगवटा प्रमाणपत्र व इतर आवश्यक असणारी प्रमाणपत्रे न घेता सिडकोच्या मालकीच्या सुमारे ५७ एकर जमिनीमध्ये विनापरवाना व्यावसाय करणार्‍या इंडियन ऑईल टॅकिंग लिमिटेड (आय.ओ. टी. एल. )कंपनी विरोधात कारवाई करण्यातबाबत  तसेच  लॉजिस्टीक पार्क, बेलोंडेखोर, ता. उरण येथील जमीन अधिग्रहण, विरार – अलिबाग कॉरीडोअरमधील शेतकऱ्यांचे जमीन अधिग्रहण या बाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व इतर संबंधित अधिकाऱ्यां सोबत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी बैठक घेतली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण विधानसभा आध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे या समस्ये बाबत प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार केली होती.

वैजनाथ ठाकूर यांनी दिलेल्या पत्रानुसार,मौजे नवघर, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील सिडकोच्या मालकीच्या प्लॉट नं. १०१, सेक्टर १ मध्ये सुमारे ५७ एकर जागेमध्ये इंडियन ऑईल टॅकिंग लिमिटेड (आय.ओ. टी. एल. ) हि कंपनी सुमारे सन १९९८ पासुन पेट्रोल, डिझेल नाफ्ता यासारखे ज्वलनशिल व घातक रसायने साठवणुकीचा व वाहतुकीचा व्यवसाय करीत आहे. 

त्यासाठी सदर जमिनीमध्ये कंपनीने टँक व इतर बांधकाम केलेले आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या सिडकोकडील परवानग्या व भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून कंपनीने घेतलेला नाहीत. तसेच कंपनीच्या चुकीच्या बांधकामाच्या नियोजनामुळे सिडको कडून त्या परवानग्या कंपनीस देणेत आलेल्या नाहीत.

वरील कंपनीने सिडकोच्या जागेचा त्यांच्या कामासाठी वापर करते म्हणुन आवश्यक असलेली लिज प्रिमिअरची रक्कम देखील सिडकोकडे भरलेली नाही. त्यामुळे सिडकोचा शेकडो करोडो रूपयाचा कर कंपनीकडून बुडवीला जात आहे. 

लोकांच्या तक्रारी,तरी सिडको कडून कंपनी विरोधात कारवाई नाही.

सदर कंपनीच्या चालू असलेल्या व्यवसायामुळे स्थानिक लोकांना त्रास होत आहे.तसेच त्यांचे नुकसान होत असल्यामुळे वरील कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी याकरिता स्थानिक लोकांनी सिडकोकडे तकारी अर्ज देखील केलेले आहेत.तरी सिडको कडून कंपनी विरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही

  प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या जमिनीमध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरावरती डोझर फिरवून प्रकल्पग्रस्तांना बेघर करणा-या सिडकोकडून वरील कंपनी विरोधात ठोस अशी कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. वरील कंपनी विरोधात सिडकोकडून कारवाई का करण्यात येत नाही याचा शोध घेणे अत्यंत जरूरीचे आहे.

वैजनाथ ठाकूर, अध्यक्ष उरण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE