हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे यांच्या १० व्या स्मृतीदिनी माजी आ. मनोहरशेठ भोईर याच्याकडून अभिवादन

उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहाव्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवार दिनाकं 17 ऑक्टोबर 2022 रोजी दादर, शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विनम्र अभिवादन केले.

गुरुवारी शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले  आहेत.

 यावेळी शिवसेना नेते माजी खासदार  चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव  मिलिंद नार्वेकर, आमदार  रवींद्र वायकर, उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळी यांनीही शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE