कोकणातून धावणाऱ्या जामनगर- तिरुनेलवेली एक्सप्रेसला उद्यापासून जादा डबा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्सप्रेस गाडीला स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे. जामनगर ते तिरुनलवेली या गाडीला दिनांक 18 ते 22 नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होऊ लागल्याने नेहमीच गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जात आहेत. यानुसार आता पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या जामनगर ते तिरुनेलवेली (19578/19577) या एक्सप्रेस गाडीला दिनांक 18 नोव्हेंबरच्या फेरीपासून दिनांक 22 नोव्हेंबर पर्यंत स्लीपर दर्जाचा एक डबा जादा जोडला जाणार आहे.
रेल्वेचे या निर्णयामुळे या गाडीच्या प्रतीक्षा यादीवर असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE