‘इस्कॉन’तर्फे रत्नागिरीत कीर्तन संध्या

रत्नागिरीवासीय भाविकांच्या आदरातिथ्याने रशियन भाविक भारावून गेले

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावानामृत संघाच्या (इस्कॉन) रत्नागिरी विस्तार केंद्रातर्फे रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी कीर्तन संध्या कार्यक्रम पार पडला. स्थानिक भाविकांसह खास रशियाहून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

या निमित्त रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील लायन्स आय हॉस्पिटलजवळील श्री जगन्नाथ एंटरप्राइजेस येथील मंदिरात सायंकाळी ६ वाजल्यापासून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत रमलेले रशियन भाविक

कार्यक्रमात सायंकाळी ६ ते ८.३० कीर्तन संध्या, सायंकाळी ८.३० ते ९ या वेळेत भगवंतांचे शयन कीर्तन तर नऊ ते साडेनऊ या वेळेत कीर्तन संध्येत सहभागी झालेल्या भाविकांना महाप्रसाद लाभ देण्यात आला.

रशियाहून आलेल्या भाविकांमुळे कीर्तन रंगत आली.
भारतातील वातावरण पाहून रशियाहून आलेल्या भाविकांनी आपण तुम्ही भारतासारख्या सुरक्षित देशात राहता त्यामुळे आपण निश्चित भाग्यवान आहात, असं अनुभव कथन केले. रत्नागिरीवासीय भाविकांनी केलेल्या आदरातिथ्याबाबत या विदेशी पाहुण्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत पुन्हा रत्नागिरी देण्याची इच्छा व्यक्त केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE