कोकण रेल्वे मार्गावरील आलिशान तेजस एक्सप्रेसही शुक्रवारपासून विजेवर धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणारी आलिशान तेजस एक्सप्रेस 25 नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. तेजससह इतर दोन एक्सप्रेस गाड्या देखील विद्युत इंजिनसह चालवण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.


तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दीत देशातील पहिली तेजस एक्सप्रेस मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अखत्यारितील मुंबई सीएसएमटी ते करमाळी दरम्यान धावली. मोठ्या दिमाखात ही वातानुकलीत आलिशान गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्यांपाठोपाठ ऑगस्ट महिन्यापासून प्रवासी गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिन सह चालवल्या जात आहेत.
रेल्वेकडून प्राप्त ताज्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्ग लावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विकली एक्सप्रेस (22115/2216), मुंबई सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्सप्रेस (22119/22120) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली (22113/22114) या गाड्या देखील आता विद्युत इंजिनचा धावणार आहेत.
यातील 22115/2216) ही ही एक्सप्रेस गाडी दिनांक 24 नोव्हेंबरपासून तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस दिनांक 25 नोव्हेंबरपासून विद्युत इंजिन सह धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान धावणारी तिसरी एक्सप्रेस गाडी दिनांक 26 नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE