देवरुखच्या द्रोण हजारेची विभागीय कॅरम स्पर्धेत मजल

रत्नागिरी :  रत्नागिरी येथे इतर पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत देवरुखच्या द्रोण हजारे याने उपविजेतेपद पटकावले. त्याची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
   द्रोण स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओम पारकर यांच्याकडून पराभूत झाला. द्रोण याने यापूर्वी जिल्हास्तरीय तीन व तालुकास्तरीय ६ स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या रत्नागिरी येथील दैवज्ञ समाजाच्या जिल्हास्तरीय सबजुनियर गटाचे विजेतेपद प्राप्त केले.
     उपविजेतेपद पटकावल्याबद्दल द्रोणची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. द्रोण हा साडवली पी एस बने इंटरनॅशनल  स्कूलचा विद्यार्थी आहे. द्रोण हा सातवीचे शिक्षण घेत आहे. त्याला क्रीडाशिक्षक अक्षय कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
  या यशाबद्दल त्याचे कॅरम जिल्हा असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, मिलींद साप्ते, राज्यपंच मंदार दळवी,  क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, माजी आमदार सुभाष बने, जि. प. सदस्य रोहन बने यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE