उरण, (विठ्ठल ममताबादे ) : गुरुवार दि 24/11/2022 रोजी सकाळी 11.30 वा. व्दारकानगरी महिला बचतगटांच्या नामफलकाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. उरण पोलिस स्टेशन मधील महिला उरणशहर युनीट प्रमुख रचना ठाकूर, प्रिती म्हात्रे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी उरण नगरपालीकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे , माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी उपस्थित साईप्रेरणा काॅलणीतील रहिवासी, अनंत घरत,जेष्ठ पत्रकार हेंमंत चव्हाण , विलास तिलोरे, राणा थापा,राव, देशमुख, गावंड, करण, पवार तसेच आयोजक द्वारकानगरी महिला बचतगटांच्या अध्यक्षा सीमा घरत, उपाध्यक्षा वृशाली कदम,सचीव अमृता गायकवाड, सहसचिव प्रिया कासकर, खजीनदार सुवर्णा पाटील,सलागार रोहिणी म्हात्रे, जयश्री चौकेकर ,हर्षदा सतेरे,आरती गुंजाळ, संगीता ढवळे,सुरेखा ढवळे, म्हात्रे आदी रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नगरपालिकेच्या हद्दीतील हे सर्व रहिवाशी गेली 12 वर्षा पासून रस्ते, बंदिस्त गटारे,पाणी या मुलभुत गरजां पासून वंचित आहेत.त्यामुळे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना या परिसराची पाहणी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.सोबत माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रेहि आल्या होत्या.मुख्याधिकारी यांनी परिसराची पाहणी करून विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.















