जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणामध्ये संविधान दिन साजरा

उरण दि 27 (विठ्ठल ममताबादे ) :

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मध्ये “संविधान दिन” साजरा करण्यात आला.यावेळी  जयवंत ढवळे मुख्य मॅनेजर, गिरीश थॉमस , जेएनपीए विश्वस्त  दिनेश पाटील व विश्वस्त रवी पाटील, माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रथम संविधान प्रस्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानाची सविस्तर माहिती जयवंत ढवळे  व भूषण पाटील यांनी दिली. 75 वर्षांपासून भारत देश एकसंघ ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे व संविधाना मध्ये  सामाजिक, आर्थिक व राजनीतीक समता सांगितले असून सर्वांनी संविधानचे प्रसार ,प्रचार व संरक्षण करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी जेएनपीएचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE