राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील कामगिरीसाठी रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

रत्नागिरी : नुकत्याच- उस्मानाबाद (धारशिव) येथे झालेल्या ५५- व्या पुरुष व महिला (वरिष्ठ गट) राष्ट्रीय अजिंक्य पद खो-खो स्पर्धा -२०२२-२३ या मध्ये महाराष्ट्राचा “महिला महाराष्ट्र संघ” विजयी झाला.


या स्पर्धेमधील अंतिम सामन्यात महिला महाराष्ट्र संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघाचा ११-९ असा डावाने शानदार विजय मिळविला. या अंतिम सामन्यामध्ये रत्नागिरीच्या कुमारी. अपेक्षा अनिल सुतार हिने (२.२० व १.१० मिनिट व १ गुण) घेऊन अष्टपैलू कामगिरी केली.
स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल कु. अपेक्षा अनिल सुतार हिला मानाचा “राणी लक्ष्मी बाई” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.


रत्नागिरीची सुकन्या, राष्ट्रीय खो-खो खेळाडू कु. अपेक्षा सुतार हिच्या उज्वल यशाबद्दल क्रीडा क्रीडा प्रेमींमधून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE