जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज इन्स्टिट्यूटमध्ये संविधान दिवस साजरा

नाणीज: येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी’संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे महत्व विशद करण्यात आले.


भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समरणार्थ २०१५ पासून प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्याची जोपासना करण्यासाठी या दिवशी अनेक उपक्रम होत असतात. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटमध्येही शनिवारी संविधान दिवस साजरा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते. कीर्तीकुमार भोसले सर यांनी यावेळी संविधान सभेच्या सदस्यांनी केलेल्या महान कार्याची माहिती दिली. या ऐतिहासिक घटनेची गरज, घटनेमागील लोक, भारतीय संविधान, भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क आणि जबाबदाऱ्या, संविधानाची प्रस्तावना अशा अनेक गोष्टी त्यांनी शिक्षकांना व मुलांना समजावून सांगितल्या. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी शपथ घेऊन भारतीय संविधानाशी बांधिलकी व्यक्त केली.


संविधानात नमूद केलेले मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये याची पोस्टर्स प्रशालेच्या शोकेसमध्ये लावण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ अंकिता महाजन यांनी केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE