कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या चार एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रवाशांची गर्दी होऊ लागल्यामुळे या मार्गावरील चार गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

गांधीधाम -तिरुनेलवेली (20924/20923), भावनगर कोचुवली (19260/19259), जामनगर ते तिरुनेलवेली (19578/19577) तसेच आप्पा मडगाव (22908/22907) एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये गांधीधाम एक्सप्रेसला दिनांक 28 नोव्हेंबरपासून 29 डिसेंबर पर्यंत, भावनगर कोचूवेली एक्सप्रेसला दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत, जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेसला दिनांक 2 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीसाठी तर हापा -मडगाव एक्सप्रेसला दिनांक 30 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीसाठी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढविण्यात आला आहे.

पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वेच्या गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने या गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE