रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग देणारे कोचुवेली ते पोरबंदर एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे रेल्वेने अतिरिक्त डबा जोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांना प्रवाशांची गर्दी होऊ लागल्यामुळे त्यातील काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.
यानुसार आता पोरबंदर ते कोचुवेली (22910/22909) या गाडीला दिनांक एक डिसेंबर रोजीच्या फेरीसाठी स्लीपर चा एक डबा ज्यादा जोडण्यात येणार आहे. दिनांक 4 डिसेंबर रोजी कोचुवेली ते पोरबंदर या मार्गावर धावताना देखील या गाडीला स्लीपर चा एक जादा जोडला जाणार आहे.















