हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी रत्नागिरी वाहन फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शनिवारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा


रत्नागिरी : अनादी काळापासून वैभवशाली व गौरवशाली परंपरा लाभलेली ही भारतभूमी आणि हिंदू धर्मावर अन्याय आणि अत्याचार यांची काजळी धरली आहे. संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश पुरवणारी हिंदू संस्कृती आज झाकोळली जात आहे, भारत भूमी आणि हिंदू धर्मावरील काजळी दूर करण्यासाठी, हिंदूंना जागृत आणि संघटित करण्यासाठी 3 डिसेंबर 2022 या दिवशी मारुती मंदिर, रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी 05 वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे .या सभेच्या प्रसारासाठी 30 नोव्हेंबर 2022 रोजी शहरातून वाहन फेरी काढण्यात आली.

या फेरीत शेकडो धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीचे श्री. महेश लाड यांनी केले.

मारुती मंदिर येथे धर्मध्वजाच्या पूजनाने फेरीला आरंभ झाला. रामआळी- गोखले नाका- काँग्रेस भवन- टिळक आळी -झाडगाव नाका- स्वातंत्र्यलक्षी चौक-गोखले नाका- मारुतीआळी येथून जयस्तंभ येथे फेरीची सांगता झाली. या फेरीमध्ये श्री मरुधर विष्णू समाज, पाटीदार समाज, हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गोसेवा संघ रत्नगिरी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून हिंदुत्वाची ज्वाला प्रज्वलित करायचे आहे ! – विनय पानवळकर, हिंदू जनजागृती समिती
हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून आपल्याला हिंदुत्वाची ज्वाला प्रगती करायची आहे. जगात ख्रिस्ती, मुसलमान यांची राष्ट्र आहेत. मात्र एकही हिंदू राष्ट्र नाही, ही वस्तुस्थिती पालटण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत याचे मार्गदर्शन हिंदू राष्ट्र जागृती सभेमध्ये करण्यात येणार आहे. हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी धर्म कर्तव्य म्हणून सभेला हिंदूंनी उपस्थित राहूया, असे आवाहन त्यांनी केले .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE