देवरूख (सुरेश सप्रे) : दि. २९ नोव्हेंबर व १ डिसेंबर दरम्यान जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा डेरवण क्रिडा संकुल येथे 19 वर्षे खालील (सीनिअर) सुवर्ण पदक पटकावलेल्या खेळाडूंची निवड विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली आहे. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्याने 1 सुवर्ण पदक व 5 रौप्य पदक पटकावून घवघवीत यश मिळवित आपला ठसा उमटवला. संगमेश्वर तालुक्याच्या सुवर्ण पदक पटकावलेल्या खेळाडूंची निवड विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
- साहिल शशांक घडशी – सुवर्ण पदक (कै. सौ. मीनाताई ठाकरे विद्यालय आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, साडवली
- करण अनिल जाधव – रौप्य पदक (आठल्ये, सप्रे, पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरूख)
- आदित्य कदम – रौप्य पदक (आठल्ये, सप्रे, पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरूख)
- राहुल सागर चव्हाण – रौप्य पदक (कै. सौ. मीनाताई ठाकरे विद्यालय आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, साडवली)
- सानिका दोरखडे – रौप्य पदक (दादासाहेब सरफरे महाविद्यालय, बुरंबी)
- आदित्य सुभाष पवार- रौप्य पदक (पैसाफंड विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, संगमेश्वर)
या खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे व प्रशिक्षक यांचे तायक्कांडोचे आश्रयदाते माजी आम. सुभाष बने. रोहन बने.क्लबच्या अध्यक्षा स्मिता लाड यांनी अभिनंदन केले.















