विंधणे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उरण दि 3 (विठ्ठल ममताबादे ) : साईभक्त धनराज लक्ष्मण पाटील (विंधणे खालचा पाडा )यांच्या वाढदिवसा निमित्त समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सौजन्याने शनिवार दि 3/12/2022 रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत उरण तालुक्यातील विंधणे, खालचा पाडा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या हस्ते करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन करून राजू मुंबईकर यांनी स्वतः पहिले रक्तदान केले.समाजात रक्ताच्या अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये व रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध निवेदक तथा सामाजिक कार्यकर्ते सूनिल वर्तक यांनी यावेळी दिली .सदर रक्तदान शिबिरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी साईभक्त धनराज पाटील,प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक, निवास पाटील, मिलिंद पाटील,अनुज पाटील,सुनील पाटील,अमित पाटील,योगेश पाटील तसेच समर्पण ब्लड बँक घाटकोपरच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जीवन डाकी यांनी केले. आयोजक धनराज पाटील यांनी दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबविण्याचा संकल्प केला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE