अलिबाग : रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.3 डिसेंबर रोजी पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या पुढाकारातून पेण येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरादरम्यान एका दिव्यांग व्यक्तीस फक्त एका तासातच रेशनिंग कार्ड काढून धान्य उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय निवडणूक विभागांतर्गत नवीन मतदान नोंदणी करण्यात आली तर संजय गांधी योजनेंतर्गतही काही लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
















