ज्योती पवार यांची सांस्कृतिक मंच सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावची सुकन्या व युवा साहित्यिकसेविका ज्योती सुचिता जयंत पवार यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

ज्योती पवार यांच्या साहित्य कला, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून आणि साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्याबाबत दिलेल्या योगदानाची दखल घेवून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी या संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ज्योती सुचिता जयंत पवार यांची निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग साहित्य क्षेत्रात सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे

कु.ज्योती पवार यांनी आतापर्यंत अनेक साहित्यिक क्षेत्रातील काव्य,चारोळी लेखन स्पर्धेत सर्वोकृष्ट,उत्कृष्ट, प्रथम,द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, लक्षवेधी, विशेष प्राविण्य असे मानांकन प्राप्त केले आहे. त्यासोबत अनेक साहित्यिक लेखन स्पर्धेत परीक्षिका म्हणूनही काम करत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE