राजू मुंबईकर यांच्याकडून अजगरांना जीवदान

उरण (विठ्ठल ममताबादे ): केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी आजपर्यंत अनेक मुक्या प्राण्यांना जीवदान दिले आहे. अनेक विषारी, बिन विषारी सापांना सुरक्षित स्थळी पोहोचवून जीवदान दिले आहे. उरण तालुक्यातील कोटक यार्ड चिर्ले जवळ जाळ्यात अडकलेल्या अजगराची राजू मुंबईकरांनी सुटका केली आहे. तसेच रोडवर आलेला अजगर गाडीखाली जाता जाता वाचला अशा अजगरला सुद्धा सुरक्षित स्थळी नेऊन त्यांचे प्राण वाचविले.

एक अजगर 8 फुटचा तर दुसरा अजगर 6.5 फुटचा होता. दोन्ही अजगरांना रायगड भूषण राजू मुंबईकर, पर्यावरण प्रेमी राजू मुंबईकरांनी जंगलात सुरक्षित स्थळी सोडले. अशा प्रकारे दोन अजगरांना राजू मुंबईकरांनी जीवदान दिले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE