खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गावर तांदूळ वाहून नेणारा ट्रक उलटला

भोस्ते घाटाच्या पायथ्याशी घडला अपघात

चिपळूण : मुंबई -गोवा महामार्गावर  खेड रेल्वे स्थानाकसमोर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी तांदळाची पोती भरलेला ट्रक उलटला. हा अपघात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.

मुंबईच्या दिशेने निघालेला मालवाहू ट्रक भोस्ते घाटाच्या पायथ्याशी अचानक उलटला. भोस्ते घाट उतरत असताना तीव्र वळणावर ट्रक उलटला. अपघातात ट्रकची केबिन निखळून चौपदरी महामार्गाच्या दुसऱ्या लेन वर जाऊन पडली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व आतील तांदळाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर तांदळाची पोती फुटल्याने शेकडो किलो तांदूळ महामार्गावर इतरत्र पसरला होता .

महामार्गावर अपघातग्रस्त झालेलला मालवाहू ट्रक
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE