रायगड जिल्हा रुग्णालयात आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते
अलिबाग : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात दिव्यांगांना अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी व योग्य सुविधा देण्यासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या कार्यात आता अजून वेग येईल, असे आ. महेंद्र दळवी म्हणाले.
अन्य दिव्यांग बांधवांनी आवश्यक साहित्य मिळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आधारकार्ड व UDID प्रमाणपत्र झेरॉक्स यांसह अर्ज करावा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आदिती दळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रतिम सुतार यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे NTCP चे सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर, DEIC चे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदीप भोईर, प्रतिमा फडतरे, समाधान चौधरी, हितेश जाधव, कैलास सोमवंशी, मंगेश म्हात्रे आदिंनी परिश्रम घेतले.

















