श्री संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रत्नागिरी महाआरती

रत्नागिरी : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दि. ८ डिसेंबर 2022 रोजी समस्त तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री संताजी जगनाडे मंदिर ट्रस्ट तेली आळी तसेच तेली आळी तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वा.महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.

यावेळी रत्नागिरी शहर व आजुबाजूच्या परिसरातील बंधुभगिनी तसेच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किशोर पावसकर ,सचीव प्रदीप रहाटे ,सदस्य, बंड्या बसणकर विजय रसाळ, श्रीसंताजी जगनाडे महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष बावा नाचणकर उपाध्यक्ष सुरेश पावसकर
सुभाष लांजेकर,सदस्य प्रकाश झगडे,
सदस्य तसेच श्रीसंताजी पतसंस्थेचे अध्यक्ष,दिपक राऊत नवरात्र मंडळाचे अध्यश श्री राहुल रसाळ मंदीराचे प्रमुख पुजारी व विश्वस्त राहूल कोतवडेकर राजकिय क्षेत्रातील बिपिन बंदरकर तसेच आ.राजन साळवी यांचे बंधु संजय साळवी उपस्थित होते.

या महाआरती कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन तेली आळी महिला मंडळ, मयूरेश पावसकर, अक्षय पावसकर,मुन्ना नाचणकर, सचिन नाचणकर, प्रशांत गांवखडकर इत्यादी उपस्थित होते. महाआरतीबाबत रत्नागिरी शहरात कौतुकाचा विषय झाला आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातून श्रीसंताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आता पुढे तेली आळी रत्नागिरी येथे 17 डिसेंबर ला मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन व 22 डिसेंबर ला पुण्यतिथि उत्सव प्रचंड उत्साहात साजरा केला जाणार आहे रत्नागिरी मधील सर्व ज्ञाती बंधुभगिनीनी याची नोंद घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे मंदीर ट्रस्टिकडून आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE