जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या प्रयत्नाला यश
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील बोकडविरा येथील वायू विद्युत निर्मिती केंद्रात 9 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 : 30 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या बॉयलरच्या भीषण स्फोटात सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगार 80 ते 85 टक्के भाजले होते. त्यातील विवेक धुमाळे याचा हायप्रेशरच्या वाफेच्या होरपळून जागीच मृत्य झाला. बोकडविरा येथील दुसरा कामगार विष्णू पाटील हा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असताना मरण पावला तर डोंगरी येथील रहिवासी असलेला तिसरा कामगार कुंदन पाटील अत्यवस्थ असल्याने तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 : 30 वाजता नवीमुंबई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतांना त्याची प्राणज्योत मालवली.
या वायू विद्युत केंद्राच्या दुर्घटनेतील एका सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगारांना त्यांचा काहीही दोष नसतांना जीवाला मुकावे लागले होते .सोमवारी 10 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री कामगार विष्णू पाटील यांचा मृतदेह वायू विद्युत निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वाजवळ आणण्यात आला होता. व्यस्थापणाने मूत कामगारांच्या वारसांच्या भविष्यासाठी त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळावा या मागणीसाठी प्रयत्न केले. मात्र निर्धास्त असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मृत कामगारांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्या ऐवजी सरकारी नियमांचे पाढे वाचण्याशिवाय विशेष काही मदत देण्यावर भर दिलाच नाही. त्यावेळी सदर मयत व्यक्तीच्या उपचाराचा खर्च एक लाख 25 हजार रुपये हा विजय भोईर यांनी स्वतःच्या खिशातून देऊन मयत व्यक्तीच्या कुटुंबाला तातडीने मदत केली.
एकंदरीत प्रकल्पातील दुर्घटना ही हलगर्जीपणातून झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी बोकडवीरा येथील मयत कामगार विष्णू पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरवातीपासूनच पाठपुरावा सुरु ठेवला होता. विजय भोईर यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून विजय भोईर यांच्या माध्यमातून मयत विष्णू पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.
विजय भोईर यांच्या पाठपुराव्या मुळे शासनाकडुन पाटील कुटुंबियांना पेन्शन व इतर सुविधा मिळाल्या आहेत. तसे आदेश सुद्धा प्रशासन कडुन देण्यात आलेले आहेत.ESI विभागाकडून मयत विष्णु पाटील यांच्या कुटुंबाला रु. 10322/- प्रति महिना पेन्शन मंजूर झाली आहे. सदर पेन्शन त्यांच्या पत्नीला पुढील संपूर्ण आयुष्यभरासाठी मिळणार आहे.
यासाठी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी जातींने पाठपुरावा करून कागदपत्रांची वेळेस पूर्तता केल्यामुळे कामगार राज्य विमा योजना विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन जी टी पी एस येथे घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. विजय भोईर यांच्या तत्परते मुळे मयत कामगाराच्या नातेवाईकांना तातडीने पेन्शन भेटून दिल्यामुळे विजय भोईर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, तसेच त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे आणि भविष्य निर्वाह निधीचा विम्याचे पैसे मिळवण्यासाठी पुढील पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन विजय भोईर यांनी दिले आहे.














