शिवसेनेत इन-कमिंग सुरूच!

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा

उरण विधानसभा मतदारसंघातील वावेघर येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

उरण दि. १२ (विठ्ठल ममताबादे ): सोमवार दिनाकं 12 डिसेंबर 2022  रोजी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख  ज्ञानेश्वर माळी यांच्या सहकार्याने उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुक्यातील  वावेघर येथील कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात (शिवसेनेत) प्रवेश केला. यामध्ये अक्षय राठोड  राजेश धोत्रे, संजय धोत्रे,  दिलीप शिंदे,  रोहीत शिंदे,  राकेश शिंदे,  विकास राठोड  यांनी आपल्या कुटूंबियांनसह शिवसेनेत प्रवेश केला.   

शिवसेना  जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी सर्व कार्यकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून शिवसेनेत स्वागत केले.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला युवकांचा, जनतेचा पाठींबा वाढत चालला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE