जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेचे रेल्वे राज्यमंत्र्यांना निवेदन
मराठवाड्यातून थेट कोकणात येण्यासाठी गाडी उपयुक्त

मुंबई : नांदेड -पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार केला जावा, या मागणीसाठी जल फाउंडेशन कोकण विभाग या नोंदणीकृत संस्थेच्या एका शिष्टमंडळाकडून बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठवाडा विभागातून थेट कोकणात येण्यासाठी ही रेल्वेगाडी उपयुक्त ठरणार असल्याने याकडे रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
नांदेड -पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार केला जावा यासाठी यासाठी मागील काही दिवसांपासून रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी तसेच जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेच्या वतीने अभ्यास सुरू होता. मराठवाड्यातील थेट कोकणात येण्यासाठी प्रवासी जनतेला लाभदायक ठरणार असल्याने विदेशात राहू नये ही गाडी सुरू व्हावी, यासाठी रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या संदर्भात जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आणि अध्यक्ष नितिन सखाराम जाधव आणि पोलादपूर तालुक्यातील सहकारी श्री चंद्रकांत उतेकर यांनी आज जन शिकायत कार्यालय, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात जाऊन पत्र दिले आहे.
गाडी मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तसेच ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही प्रवास करायला सोपा पर्याय उपलब्ध होईल. ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल आणि आपल्याला एक गाडी मिळेल जेणेकरून इतर गाड्यांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही मदत होईल.














