कोकण रेल्वे मार्गे आणखी चार एक्सप्रेस विजेवर धावणार!

त्रिवेंद्रम- हजरत निजामुद्दीन विकली एक्सप्रेसला उद्यापासून विद्युत इंजिन जोडणार


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिन जोडून चालवण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या दूरपल्ल्याच्या आहेत.


या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस (12620) ही दिनांक 18 डिसेंबरपासून तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल दरम्यान धावणारी डाऊन मत्स्यगंधा एक्सप्रेस (12619) दिनांक 19 डिसेंबर पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस गाडी (22653) ही दिनांक 17 डिसेंबर पासून तर हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी विकली एक्सप्रेस (22654) दिनांक 19 डिसेंबर पासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.


कोकण रेल्वे मार्ग धावणारी तिसरी नियमित एक्सप्रेस गाडी तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (22633) दिनांक 21 डिसेंबर पासून तर ही गाडी (22634) तिच्या विरुद्ध दिशेच्या प्रवासासाठी धावताना दिनांक 23 डिसेंबर पासून विजेवर धावणार आहे.
डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनसह धावणारी चौथी एक्सप्रेस गाडी कोचुवेली ते योगनगरी ऋषिकेश दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस(22659) आहे. ही गाडी 23 डिसेंबरपासून विजेवर धावणार आहे. विरुद्ध दिशेच्या प्रवासात ही गाडी योग नगरी ऋषिकेशहून दिनांक 26 डिसेंबरपासून विजेवर धावण्यास सुरुवात होणार आहे.


दरम्यान आणखीन चार गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिन सह धावू लागल्याने आता कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या अवघ्या काही गाड्याच डिझेल इंजिनचा धावणार आहे. त्या देखील विद्युत इंजिन उपलब्ध झाल्यानंतर विद्युत ट्रॅक्शन वर चालवल्या जाणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE