मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रिफायनरीसाठी लवकरच जमिन मोबदला जाहीर करणार : मुख्यमंत्री

रत्नागिरी : बाळासाहेबांचे कोकणावर आणि कोकणचे बाळासाहेबांवर प्रेम हे सर्वज्ञात आहे आहे. हे प्रेम यापुढेहि दअसेच कायम राहील. भविष्यात कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढताना पर्यटन, बीच डेव्हलमेंट, गडकिल्ले संवर्धन मोहीम राबवताना मुंबई – गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे वेगाने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय विश्रमगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच रिफायनरीसाठी लवकरच जमिनीचा मोबदला जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आपण बाळा साहेबांचे विचार घेऊन काम करतोय आणि म्हणूनच आपण कोकणावर सर्वाधिक लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. राज्याच्या कॅबिनेट मध्ये कोकण विकासावर चर्चा झाली असून संधी तपासून कोकण विकासाला गती देण्याचे काम भविष्यात हाती घेतले जाईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबई – गोवा महामार्गाचे काम प्राधान्याने हाती घेताना सागरी महामार्गाची देखील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

बिच डेवलपमेंट, गड किल्ले संवर्धन करताना कोकणात येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देऊन इथला विकास कशा पद्धतीने अधिकाधिक करता येईल यावर विचार सुरू आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE