आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व मॅरेथॉन २६ व २७ रोजी
देवरूख( सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दि.२४ ते ३० डिसेंबर या कालावधीत कला, क्रीडा,व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २६ व २७ रोजी आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे.
माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत परिसरातील सुमारे ४० प्राथमिक व माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत
२४ ,२५, २८,२९ डिसेंबर रोजी शालांतर्गत क्रीडा स्पर्धा होणार आहेत.तर २६ रोजी आंतरशालेय कबड्डी स्पर्धा होणार आहेत.या कला व क्रीडा महोत्सवाचे उदघाटन सकाळी ८.३० वाजता रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत व निवृत्त कोषागार अधिकारी प्रकाश रेडिज यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी अटल टिंकरिंग लॅब,रांगोळी प्रदर्शन,वाचनालय,सुसज्ज प्रयोगशाळा,bशेतीपूरक उपक्रम,टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू आदींच्या प्रदर्शनांचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
२७ रोजी सकाळी ८.३० वाजता माखजन दशक्रोशीस्थ विद्यार्थी व नागरिकांची मॅरेथॉन स्पर्धा व कबड्डी स्पर्धा होणार आहे.याचे उदघाटन महाराष्ट्र राज्य गुणवंत खेळाडू पुरस्कार २०१९ चे विजेते अविनाश पवार आणि उद्योजक व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप जोशी यांचे हस्ते उदघाटन होणार आहे.
सायंकाळी ४ वाजता आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व परशुराम युवा मंच व माखजन दशक्रोशीचे अध्यक्ष प्रसन्न बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

३० रोजी सकाळी ९ वा .वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.यावेळी चिपळूण चे उद्योजक प्रकाश गगनग्रास व गृह उद्योजिका सौ मीनाक्षी सौंदलगेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी ६ वाजता माखजन हायस्कूल,माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल माखजन,ऍड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत.
प्रशालेत होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन स्नेहसंमेलन प्रमुख महादेव शिंदे, मुख्याध्यापिका सौ. रुही पाटणकर, संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांनी केले आहे.














