एसटीची मुंबई-पणजी वातानुकूलित शिवशाही बससेवा २३ डिसेंबरपासून

मुंबई : एसटी महामंडळाकडून ” मुंबई – पणजी – मुंबई “ मार्गावर वातानुकूलित शिवशाही सेवा दि. 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे. मुंबई सेंट्रल वरून ही बस सायंकाळी 4.30 वाजता तर पणजी येथून देखील ती मुंबईसाठी सायंकाळी साडेचार वाजता सुटणार आहे.

दादर, सायन, कुर्ला, नेहरूनगर, मैत्री पार्क, वाशी, नेरूळ, कोकण भवन, खारघर, कामोठे, पेण, रामवाडी, महाड, चिपळूण, संगमेश्वर, पाली, लांजा, राजापूर, खारेपाटण, तळेरे कणकवली, कसाल, कुडाळ, सावंतवाडीमार्गे ही गाडी पणजीला जाणार आहे.

प्रवाशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा. या बसचे आरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आववाहन कोकण एसटी प्रेमी ग्रुप व मुंबई आगारामार्फत करण्यात आले आहे

आरक्षण ऑनलाईन, बस स्थानक व आगारमध्ये उपलब्ध आह. ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी https://public.msrtcors.com ह्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

शिवशाही बसचे तिकीट दर
मुंबई – पणजी 1,255/- ₹
पणजी – मुंबई 1,255/- ₹

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE