चिपळूण, रत्नागिरीसह कणकवली, सिंधुदुर्गला थांबणार
रत्नागिरी : पनवेल, रोहा चिपळूण रत्नागिरी मार्गे धावणारी मुंबईतील सीएसएमटी ते कन्याकुमारी अशी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 22 डिसेंबर रोजी धावणार आहे.
कोकण रेल्वेच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी सुपरफास्ट एक्सप्रेस (01461) दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सी एस एम टी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी ती कन्याकुमारीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01462) कन्याकुमारी येथून दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी मुंबईसाठी सुटेल. ही गाडी कन्याकुमारी हुन दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता ती मुंबईतील सीएसएमटीला पोहोचेल.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी ही सुपरफास्ट स्पेशल गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडपी हे थांबे घेत एरनाकुलम मार्गे कन्याकुमारीला जाणार आहे. ही गाडी 20 डब्यांची गाडी धावणार आहे














